दर्यापूर (:-तालुका प्रतिनिधी) दर्यापुरात अवतार मेहेर बाबांचा 129 वा जन्मोत्सव 25 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. पहाटे ठीक 5 वाजता अवतार मेहेर बाबा अध्यात्मिक केंद्र दर्यापूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात मेहेर बाबांचा जयजयकार करुन पार पडला. सकाळी ठीक 7:30 वाजता केंद्रावरून मेहेर बाबांच्या प्रतिमेची पालकी सह भव्य मिरवणूक दर्यापूर शहरातून काढण्यात आली. मेहेर बाबांच्या जन्मोत्सवाचा समारोप केंद्रावर महाप्रसादाने करण्यात आला. 19 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पर्यंत अवतार मेहेर बाबा अध्यात्मिक केंद्र दर्यापूर या ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आले यात रांगोळी स्पर्धा, डिश डेकोरेशन, फ्लॉवर डेकोरेशन, ग्रीटिंग कार्ड स्पर्धा, आनंद मेळा इत्यादी कार्यक्रमात महीला मंडळींचा उत्स्फुर्त प्रतिसाद होता. 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता मेहेर सेवा ( सेवकाई मे प्रभू ताई) कुष्ठरोग्यांना कपडे वाटप व भोजनदान याप्रसंगी करण्यात आले. शोभायात्रे दरम्यान उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना दूध, बिस्कीट आणि फळे वाटप करण्यात आले. शोभायात्रे महीला पुरुष व लहान चिमुकल्यांचा मोठा सहभाग होता. यावेळी मनोहरराव लोंधे, श्री हरिदास कडू, विनायकराव होले, अविनाश शेखार, अशोकराव दुर्गे , राजूभाऊ चुटे, प्रमोद धर्माळे, रमेशभाऊ लोणकर, वंदनाताई लोंधे, नलिनीताई होले, मंदाताई तिवाणे, मथुराताई भारसाकळे, शालिनीताई म्हाला, सौ मानकर,बाळासाहेब भारसाकळे, राजेश तारळे , श्रीकृष्ण भगत, व शेकडो मेहेर प्रेमी शोभायात्रेत उपस्थित होते.
दर्यापूर नगरीत अवतार मेहेर बाबांचा 129 वा जन्मोत्सवाचा भव्य शोभायात्रा व महाप्रसादाने झाला समारोप
RELATED ARTICLES