Tuesday, February 24, 2026
Homeनेशनल न्यूज़तो दारू पेला अन त्याचा थंडीमुळे मृत्यू झाला! टुनकी येथील घटना 

तो दारू पेला अन त्याचा थंडीमुळे मृत्यू झाला! टुनकी येथील घटना 

(मतीन शेख)

बुलढाणा : जिल्ह्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीत एक इसम दारू पिऊन सम्शानभूमी टुनकी येथे झोपला व सकाळी त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटना आज दि.८ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली आहे. सविस्तर वृत्त अशे की सुरेश तात्या कोष्टी वय ४६ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टुनकी येथील बौद्ध समाजाच्या सम्शानभूमी जवळ एक इसम दारू पिऊन रात्री झोपला. थंडीचा पारा दिवसेंदिवस खाली जात असल्याने वाढत्या थंडीचा फटका उघड्यावर झोपणाऱ्या त्या व्यक्तीला बसल्याने त्याचा मृत्यू झाला. राम रामराव शिरसागर रा. परसापूर ता. अचलपूर जि. अमरावती ह.मु. टुनकी जि. बुलढाणा अशे या मृतक व्यक्तीचे नाव आहे. सोनाळा पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास बिट जमादार पोहेकॉ विशाल गवई करत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!