दर्यापूर -(तालुका प्रतिनिधी)तालुक्यातील तोंगलाबाद येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दर्यापूर येथील कौशल्या देवी जगन्नाथ मालपाणी चॅरिटेबल ट्रस्ट दर्यापूर च्या वतीने कर्मयोगी संत गाडगेबाबा जयंती निमित्ताने भव्य मिस्टन भोजनदान कार्यक्रम स्वर्गीय जगन्नाथ शेठ मालपाणी स्मृती पिक्चर संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गाडगेबाबांची जयंती उत्साहात साजरी होत असताना त्यानिमित्ताने दर्यापूरचे प्रति रतन टाटा सामाजिक कार्यकर्ते रामुशेठ मालपाणी यांचा माजी सरपंच राम हरिभाऊ यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार गावकरी मंडळी यांच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाला माजी सरपंच रामहरी राऊत, गाडगे महाराज मिशन संचालक गजानन देशमुख, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आदर्श शिक्षक नंदकिशोर रायबोले, शिक्षिका तेजस्विनी अटाळकर, डॉ गोपाल जऊळकार,युवा पत्रकार महेश बुंदे, सामाजिक कार्यकर्ते पप्पू मिर्झा, कौशल्या देवी चारिटेबल ट्रस्ट चे व्यवस्थापक नामदेवराव उटाळे, बाळासाहेब जळमकर, देविदास जऊळकार, वामनराव जळमकर व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तोंगलाबाद ग्रामस्थांना संत गाडगेबाबा जयंती निमित्ताने दिले भोजनदान
RELATED ARTICLES