(मतीन शेख)
बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली तालुकाध्यक्ष शेख कदीर शेख दस्तगीर यांनी तामगाव पोलिस स्टेशन चे ठाणेदार राजेंद्र पवार यांना २० जुन रोजी निवेदन दिले होते. तसेच पत्रकार संघाला युवा स्वाभिमान पार्टी कडून जाहीर पाठिंबा दिला असून यांनी सुद्धा तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी निवेदन दिले आहे. परंतु आज पर्यंत तालुक्यातील अवैध धंद्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने शेख कदिर व रवी सोळंके यांनी आज दि.४ जुलै रोजी तामगाव पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणास सुरूवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भिमराव पाटील व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष लियाकत खान यांनी तालुकाध्यक्ष शेख कदीर यांना भेट दिली. तर या उपोषणाला वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका अध्यक्ष आशिष धुंदळे यानी युवा आघाडी कडुन जाहिर पाठींबा व आपले मत व्यक्त केले. ते बोलत होते की संग्रामपूर तालुक्यातील वरली मटका, फुल फकडी, देशी दारू विक्री अशा अवैध धंद्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे याच धंद्यांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करा अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडी करून यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला. त्यावेळी यशवंत मारुती वानखडे, अक्षय उत्तम वानखडे, दिशांत अशोक अजने, रफिक भाई पत्रकार, ईसूब भाई पत्रकार, रामेश्वर गायकी पत्रकार, ज्ञानेश्वर दांदळे पत्रकार, श्यामसुंदर पत्रकार, मंगेश टाकसाळ पत्रकार, विवेक राऊत पत्रकार, निलेश तायडे, डाबेराव फेटेवाले, स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवराव सोळंके यांच्यासह आदींची उपस्थिती होती.