(मतीन शेख)
बुलढाणा: एटीएम कटिंगसह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक करून मोठे यश मिळविले आहे. तामगाव पोलिस स्टेशनच्या अप. क्र. ०५/२०२४ अंतर्गत दाखल असलेल्या कलम ३९५, ३८०, ४२७,३४ भादवी या गुन्ह्यात तसेच सन २०१४ पासूनच्या एटीएम कटिंग प्रकरणात सतत फरार असलेल्या साजिद खान उर्फ जम्मू झाडी बशीर खान वय ३४, रा. जालना याचा शोध घेण्यासाठी पथक सक्रिय होते. अखेर आज दि.१० डिसेंबर २०२५ रोजी पथकाने आरोपीला गाठून त्यास ताब्यात घेतले. अटकेनंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी तामगाव पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. या अटकेमुळे परिसरातील एटीएम कटिंग प्रकरणाला महत्त्वपूर्ण कलाटणी मिळाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे व अपर पोलिस अधीक्षक बुलढाणा/खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.
कारवाई मध्ये पोलिस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, हेकॉ एजाज खान, पोकॉ अमोल शेजोल, पोकॉ अजीस परसूवाले, कैलास ठोंबरे, शिवानंद हेलगे यांनी पार पाडली. स्थानिक गुन्हे शाखाच्या तत्पर कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.