(मतीन शेख)
संग्रामपूर : तालुक्यातील टुनकी ग्रामपंचायतीवर राजेंद्र वानखडे यांची एकहाती सत्ता आहे. १३ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.वंदना गायकवाड यांनी आपसात ठरल्याप्रमाणे सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी सोमवारी दि.६ जानेवारी रोजी ग्रामपंचायत टुनकी कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी सौ.सीमा राजेंद्र वानखडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी चामलाटे यांनी सौ.सीमा राजेंद्र वानखडे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. टुनकी गावच्या सरपंच झालेल्या सीमाताई वानखडे ह्या संग्रामपूर तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच माजी सरपंच असलेले राजेंद्र वानखडे यांच्या पत्नी आहेत. सौ.सीमाताई यांचे सासरे आर.एल.वानखडे हे देखील टुनकीचे सरपंच होते. त्यामुळे इतिहासात मागासवर्गीय कुटुंबातून एकच परिवारात तीन वेळा सर्वसाधारण जागेवर सरपंच होण्याचा मान टुनकीच्या वानखडे कुटुंबांनी मिळविला आहे.