(मतीन शेख)
बुलढाणा : चिखली पोलीस स्टेशन हद्दीत नागरिकांचे अनेक मोबाईल मागील दिवसांपासून चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी तांत्रिक तपास करून विविध ठिकाणाहून चोरी गेलेले १८ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहे. गहाळ झालेल्या त्या मोबाईलची किंमत २ लाख रुपये इतकी असल्याचे सांगीतले जात आहे. दि. १६ जुलै रोजी मंगळवार रोजी तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना मोबाईल परत करण्यात आले आहे. तक्रारीवरून गहाळ झालेल्या मोबाईलचा आढावा घेत पोलीसांनी शोध मोहीम राबवली होती. मोहिमेमध्ये गहाळ मोबाईलचे लोकेशन ट्रेस करण्यात आले. चिखली ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विजय किटे, सुनील राजपूत, चंद्रशेखर मुरडकर, महिला पोलीस अंमलदार रुपाली उगले यांनी ही कारवाई केली. चिखली पोलिसांच्या या कामगिरीने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.