(मतीन शेख)
अकोला: प्रसिद्ध सामाजिक संस्था खादमीन-ए-उम्मत तर्फे १८ व्या सीरत कार्यक्रम निमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण आज दि.२ फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये संपन्न झाले. खादमीन-ए-उम्मतने दिलेल्या पुरस्कारांमध्ये अकोला जिल्ह्यालाही स्थान मिळाले आहे. यावेळी ख्वाजा गरीब नवाज स्कूल अकोला येथे कार्यरत शेख वसीम अहमद यांना संस्थेच्या वतीने “आदर्श शिक्षक” पुरस्कार प्रदान करण्यात आला. शेख वसीम अहमद यांनी डीएड आणि बीएससी बीएड पूर्ण केल्यानंतर शिक्षण क्षेत्रात आपले करिअर निवडले. शेख वसीम अहमद हे हातरुण गावामध्ये चालणाऱ्या इकरा ग्रुप ऑफ स्कूल्सचे सचिव देखील आहेत. बदलत्या काळानुसार शिक्षण व्यवस्थेत होणारे बदल लक्षात घेऊन त्यांनी शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांना वर्गात मर्यादित न ठेवता, वैज्ञानिक कल वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यावर ते भर देतात. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने चालणाऱ्या शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्येही बदल घडवून आणण्याची जाणीव निर्माण झाली आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शेख वसीम अहमद यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. शेख वसीम अहमद म्हणाले, “मला या उंचीवर आणल्याबद्दल मी अल्लाहचे आभार मानतो, तसेच सर्व लोकांसह विशेषतः माझे मार्गदर्शक मोहम्मद फारूख सर ज्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आणि मला या उंचीवर आणले. मला तिथे पोहोचण्यास मदत केली.