(मतीन शेख)
अकोला : दिवसा ढवळ्या खुलेआम अवैध वाळूची वाहतुक विक्री सुरु आहे. महसुल व उरळ पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. जिल्हाधिकारी यांच्यावर लक्ष देणार का? अशी मागणी जोर धरत आहे. शासनाने हर्राशी नाकारल्यामुळे बाळापुर तालुक्यातील उरळ पोलिस स्टेशन हद्दीत अवैध वाळू विक्रिला चांगलाच उत आला असुन ग्रामिण भागात दिवसा ढवळ्या कोनाचाही धाक न बाळगता खुले आम विना नंबरच्या वाहनातून बाळापूर तालुक्यातील उरळ पोलिस स्टेशन हद्दीत काजीखेड, मोखा, नागत, सागत, हाता, निंबा परिसर कवढा, डोंगरगाव, हातरुण, बोरगाव वैराळे, सोनाळा, लोणाग्रा, आगर सह निंबा फाटा चौपाटी पोलिस चौकी तथा पोलिसांनी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेतून ४० ते ५० टाटा वाहन व ५० ते ६० ट्रॅक्टर रात्र दिवस ये-जा करत आहे. या परिसरातुन ग्रामीण भागात अवैध वाळू तस्करी व विक्रिला चांगलाच उत आल्याने या वाळू तस्करावर महसुल प्रशासन व उरळ पोलीस कुठली ही ढोस कारवाई करत नसल्याने याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देउन खुलेआम चालु असलेल्या अवैध वाळू तस्कऱ्यांवर कारवाई करून मुसक्या आवळाव्या अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिक करत आहेत. या अवैध वाळू विक्रिमुळे सामान्य नागरिकांना भुर्दंड बसत असून अव्वाचा सव्वा दराने हे अवैध वाळू तस्कर रात्री बेरात्री व दिवसा ढवळ्या जास्त पैसे घेऊन सामान्य नागरिकांची लुट करत आहेत.