(मतीन शेख)
बुलढाणा : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा आज वाढदिवस. यांच्या वाढदिवसानिमित्त एकलव्य आदिवासीं आश्रम शाळा जामोद येथे विद्यार्थ्यांना वही पेन व फळांची वाटप करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संत गजानन महाराज चरणी प्रार्थना करून उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना शतायुषी व निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना सर्व पदाधिकारी यांनी केली. यावेळी विद्यार्थी सेना तालुका प्रमुख आकाश तेलंग्रे, युवासेना तालुका प्रमुख संग्रामपूर ईश्वर गावंडे पाटील, युवासेना तालुका प्रमुख अमोल दाभाडे जळगांव, युवासेना उप ता.प्रमुख नामदेव भगत, रामा घाटोळे शाखा प्रमुख जामोद, वैभव धर्मे, पंकज घाटे , आशिष ढगे, नितीन उमाळे, वसंता गवई, शुभम हांडे यांच्यासह सर्व युवासेना विद्यार्थी सेना पदाधिकारी उपस्थित होते.