(मतीन शेख)
बुलढाणा: जिल्ह्यातील सर्वात शेवटचे टोक असलेल्या संग्रामपूर तालुक्यात वन्यप्राणी रस्त्यावर भ्रमंती दरम्यान आढळून येतात. अशातच बेजबाबदार वाहन चालकाच्या चुकीमुळे अपघातात वण्यप्राण्यांना नाहक बळी जातो. दरम्यान अशीच घटना आज दि.३० जानेवारी रोजी सकाळी एक हरीण जळगाव (जा) ते अकोट राज्यमार्गावर सोनाळा-टुनकीच्या मधोमध देविच्या मंदिरा जवळ एक हरीण अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या अवस्थेत आढळून आले .या मुख्य रस्त्याच्या कडेला अंदाजे दोन दिवसापासून मृत अवस्थेत हरीण पडलेले असल्याने यावरून वनविभागाचे पुर्णतः दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट दिसून येते . या मुख्य रस्त्यावर बरेच वेळा अशा प्रकारे वन्य प्राण्यांचा वाहनांच्या धडकेमध्ये नाहक जीव जातो व जखमी सुद्धा होतात परंतु या मृत्यू पडलेले व जखमी प्राण्यांच्या बाबतीत शिकारी उद्देशातील चोर या प्राण्यांच्या अवयवांचे पुर्णतः चोरी करून फायद घेतात परंतु वन विभाग अशा घटनांबाबत सतर्कता न दाखवता कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याचे स्पष्ट दिसून येते . अशा घटना बरेच वेळा घडत असल्याचे नागरिकांमधून बोलल्या जात आहे .यावरून वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे व या शिकारी चोरांचा बंदोबस्त करणे ही तेवढ्याच महत्त्वाचे आहे . या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे .