(मतीन शेख)
अकोला : आजकाल अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. रस्त्यावर अपघात होऊन बहुतांश लोकांनी आपले जीवन समाप्त केले आहे. मात्र वाहन चालवतांना आपण डोक्याला हेल्मेट लावले तर आपले जीवन वाचवू शकते. त्या उद्देशाने सार्वजनिक सुरक्षितता व प्रवास दरम्यान हेल्मेट वापरण्याचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अकोला पोलीस अधीक्षक बच्चनसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.१ फेब्रुवारी रोजी स्थानिक अकोट शहरामध्ये अकोट उपविभाग, अकोट शहर पोलीस व अकोट ग्रामीण पोलीस यांच्या वतीने हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आली. सदर रॅलीमध्ये सहभागी झालेल्यांनी हेल्मेट घाला, सुरक्षित प्रवास करा आणि आपल्या स्वतःच्या कुटूंबासाठी हेल्मेटचा वापर करा असे नागरिकांना आवाहन करून जनजागृती करण्यात आली. रॅली दरम्यान मोटार सायकलस्वार व नागरिकांना हेल्मेटचे महत्व पटवुन सांगण्यात आले. सदर रॅलीचे नेतृत्व श्री अनमोल मित्तल, सहायक पोलीस अधीक्षक, अकोट उपविभाग, अकोट यांनी केले. रॅलीमध्ये पोलीस निरीक्षक श्री अमोल माळवे, पोलीस निरीक्षक श्री किशोर जुनघरे तसेच स्थानिक पोलीस स्टेशन अकोट शहर, अकोट ग्रामीण येथील वाहतुकीचे काम पाहणारे वाहतुक अंमलदार वैयक्तिक वाहनासह वाहतुक गणवेष परिधान करुन ०२ मोटार सायकलसह ०२ वाहतुक अंमलदार, बीट पेट्रोलींग ४ मोटारसायकलसह ०८ अंमलदार, दामिनी ०२ मोटार सायकलसह महिला पोलीस अंमलदार ०४, पोलीस स्टेशन अकोट शहर येथील ४८ मोटार सायकलसह ५२ अंमलदार, आर.सी.पी.१० मोटार सायकलसह २० अंमलदार, एसडीपीओ कार्यालय अकोट येथील ४ अंमलदार ०२ मोटार सायकलसह सहभागी झाले होते. सदर रॅली पोलीस स्टेशन अकोट शहर येथून निघून प्रथम अकोला नाका, त्यानंतर शिवाजी चौक, मच्छी मार्केट, अंजनगाव रोड, धारोळीवेस चौक, आंबोडी वेस, रामटेकपुरा, शौकतअली चौक, मोठे बारगण चौक, बळीराम चौक, सोमवार वेस, यात्रा चौक, नरसिंग रोड, सोनु चौक, शिवाजी चौक या मार्गाने फिरुन परत पोलीस स्टेशन अकोट शहर येथे पोहोचून संपन्न झाली. जर कोणतेही पोलीस अंमलदार बाईकने विना हेल्मेट प्रवास करतांना दिसून आल्यास त्या बाबतची माहीती अनमोल मित्तल सहायक पोलीस अधीक्षक अकोट उपविभाग, अकोट यांना दयावी. संबंधित पोलीस अंमलदार यांच्यावर कारवाई करण्यात येईल. अशे आवाहन सुद्धा अकोट पोलीसांकडुन नागरिकांना देण्यात आले आहे. मागील पाच वर्षामध्ये वाहन चालवितांना हेल्मेट न घातल्यामुळे अकोला जिल्हयामध्ये २२३ मोटार सायकलस्वारांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे आणि १४० मोटार सायकलस्वार जखमी झाले होते. मागील वर्षामध्ये जेवढे नागरिक (मर्डर) हत्यामध्ये मृत्यू पावले नसतील त्यापेक्षा अधिक नागरिकांनी हेल्मेट न वापरल्यामुळे त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. नागरिकांनी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर केल्यास त्यांना ८० टक्के जीवदान मिळू शकते. त्यामुळे वाहन चालवितांना नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा असे नागरिकांना आवाहन करण्यात आले. प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटूंबाची सुरक्षितता लक्षात घेवून हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. अपघातांमध्ये होणा-या गंभीर स्वरुपाच्या जखमा आणि जिवीतहानी टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातुन हेल्मेट हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. जनतेने जागरुक नागरिक या नात्याने वाहतुक नियमांचे पालन करावे असे बच्चनसिंह पोलीस अधीक्षक अकोला यांचेकडुन नागरिकांना आवाहन केले आहे.