(मतीन शेख)
अकोला : अकोट ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा वाहतुकीवर कारवाई करत ७९ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आज दि.११ डिसेंबर गुरुवार रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अकोट- अंजनगाव मार्गावर गुटखा वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती.त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या आदेशाने वाई फाट्याजवळ नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान एक व्यक्ती मोटारसायकलवर प्लास्टिकच्या पांढऱ्या गोण्यांसह जाताना दिसल्याने त्याला थांबवून पंचांपुढे चौकशी करण्यात आली. त्याने आपले नाव सचिन कैलास बोरोहे वय ३५, रा. नंदिपेठ अकोट असे सांगितले. गोण्यांविषयी विचारले असता तो टाळाटाळ करीत असल्याने पंचासमक्ष गोण्या उघडण्यात आल्या असता शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पान मसाला आढळून आला. कारवाई दरम्यान २९ हजार ६४० रुपयांचा गुटखा तसेच त्याच्या वाहतुकीसाठी वापरलेली ५० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल असा एकूण ७९,६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस पोलिस स्टेशनला आणून त्याच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. चंद्रकांत बी. रेड्डी व सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ उमेशचंद्र सोळंके, पोहेकॉ भास्कर सांगळे, पोकॉ सचिन कुलट यांनी केली.