Monday, February 23, 2026
HomeUncategorizedबावनबीरमध्ये कुलूपबंद घरांवर चोरट्यांचा डल्ला; तीन घरफोड्यांची घटना उघड

बावनबीरमध्ये कुलूपबंद घरांवर चोरट्यांचा डल्ला; तीन घरफोड्यांची घटना उघड

 

(मतीन शेख)

बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कुलूपबंद घरांना लक्ष्य करत घरफोड्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील बंद असलेल्या घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यामध्ये जमीर मिर्झा, वसु साहेब आणि गणेश अकोटकार यांच्या घरांचा समावेश आहे. संबंधित घरमालक बाहेरगावी असताना ही घटना घडली. प्राथमिक पाहणीत ज्या घरांना कुलूप होते त्या घरांमध्ये चोरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. गावकऱ्यांनी रात्रीच्या वेळी अधिक दक्षता बाळगण्याची गरज व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!