(मतीन शेख)
बुलढाणा: जिल्ह्यातील वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांनी धडक कारवाई करत मोठे यश मिळवले आहे. दि.२७ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या कारवाईत तीन सराईत चोरट्यांना ताब्यात घेऊन चार वेगवेगळ्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा खामगाव व अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस स्टेशन बुलढाणा शहर गुन्हा क्रमांक ९४९/२०२१, कलम ३७९ भादंवि अंतर्गत सुरू असलेल्या समांतर तपासादरम्यान आरोपींचा माग काढण्यात आला. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून बुलढाणा शहर, बोरखेडी तसेच नालासोपारा मुंबई परिसरातून चोरीस गेलेल्या चार दुचाकी मोटर सायकल जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे २ लाख ५० हजार रुपये आहे. या कारवाईमुळे चार पोलिस स्टेशन मधील दाखल असलेल्या गुन्ह्यांचा छडा लागला आहे.(१) पोलीस स्टेशन बुलढाणा शहर गुन्हा क्र. ९४९/२१ व १०६०/२३ (२) पोलीस स्टेशन बोरखेडी गुन्हा क्र. ४१५/२१ (३) पोलीस स्टेशन नालासोपारा गुन्हा क्र. २०८/२४ अशी पोलीस स्टेशनचे नावे असून आकाश सुरेश पवार वय २३ रा.बुलढाणा, सुरेश गजानन झाल्टे वय ३० वर्ष रा. व्यंकटेश नगर बुलढाणा, दत्ता तुळशीराम शेळके वय ४२ रा. भादोला तालुका बुलढाणा अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन बुलढाणा शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या यशस्वी कारवाईत पोलिस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, हेकॉ दीपक लेकुरवाडे, हेकॉ एजाज खान, हेकॉ राजेंद्र अंभोरे, एनपीसी अरविंद बडगे, पोकॉ अमोल शेजोल, पोकॉ अजीस परसूवाले, TAW व पोकॉ ऋषिकेश खंडेराव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे वाहन चोरट्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे.