Tuesday, February 24, 2026
HomeUncategorizedअकोल्यातील खडकी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

अकोल्यातील खडकी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

 

(मतीन शेख)

अकोला: मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आदर्श शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील खडकी परिसरात उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माँ जिजाऊ बहुउद्देशीय महिला मंडळ यांच्या वतीने गुरुवारी सकाळपासून विविध उपक्रम राबविण्यात आले. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण व महाआरती करून अभिवादन करण्यात आले. परिसर शिवभक्तांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. कार्यक्रमास महानगरपालिका उपआयुक्त विजयकुमार परतवार, शेजारी फाउंडेशनचे अध्यक्ष विजय गडलिंगे, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख मंगेश काळे, नगरसेविका सौ. सुरेखा मंगेश काळे, नगरसेवक पराग गवई, शंकर लंगोटे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कु. अनुजा सचिन अंभोरे हिने शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांची दूरदृष्टी, न्यायनिष्ठा व पराक्रम याविषयी विचार मांडले. तसेच नवनियुक्त नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. मंडळाच्या अध्यक्षा नयना सरदार यांनी मंडळाचे उद्दिष्ट स्पष्ट करत सर्वांच्या सहकार्याने परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिभा सुरवाडे, तिलोत्तमा शेगोकर, सुरेखा कोकणे, सुरक्षा अंभोरे, मोहिनी जामनिक, पूजा सुरवाडे, मिनू सुरवाडे, शुभम सुरवाडे यांच्यासह अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले. खडकी परिसरात शिवजयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!